ठिकठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापे; ११ जणांविरूध्द गुन्हे दाखल
Satara News : सातारा शहर पोलीस ठाणे व शाहूपुरी पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापे टाकले. या कारवाईत रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला असून एकूण ११ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, राजवाडा परिसर, काशी विश्वेश्वर मंदिर, राजधानी टॉवर्स येथे या धाडी टाकण्यात आल्या.
रफिक कादर शेख (वय ३२, रा. शनिवार पेठ), गुलाब यासिन आतार (वय ५३, रा. गडकर आळी), शंकर व्यंकट पवार (वय ३८, रा. अंगापूर, ता. सातारा), समीर सलीम कच्छी (रा. सैदापूर), निलेश नामदेव शेलार (वय ३०, रा. मंगळवार पेठ), विक्रांत बाळकृष्ण दुबळे (वय २८, रा. मंगळवार पेठ), यासिन इक्बाल शेख (रा. गुरुवार परज, सातारा), राजन अशोक सांडगे (मंगळवार पेठ), सुरज संदेश सावंत (वय २९, रा. गेंडामाळ, सातारा), रमेश कालिदास धुमाळ (वय ५८, रा. मंगळवार पेठ), प्रवीण नरसिंह पोतदार (वय २९, रा. शाहूपुरी) या संशयित आरोपींवर दोन्ही पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल झाले आहेत.
छुप्या पध्दतीने जुगार अड्डे
सातारा शहरात छुप्या पध्दतीने जुगार अड्डे सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पथके तयार करुन राजवाडा परिसर, काशी विश्वेश्वर मंदिर, राजधानी टॉवर्स येथे छापे टाकले आहेत. पोलिसांनी छापे टाकल्यानंतर संशयितांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. घटनास्थळाचा पंचनामा केला असता रोख सुमारे ६ हजार ५०० रुपये व जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. संशयितांवर गुन्हे दाखल करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या