Satara News : डिझेल चोरताना अल्पवयीन मुलांसह तिघे सापडले


बोरगावमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाहनांमधून गुपचूप चोरायचे डिझेल
 

Satara News : सातारा तालुक्यातील बोरगाव येथील गॅरेजजवळ उभ्या असलेल्या वाहनातून डिझेल चोरत असताना दोन अल्पवयीन मुलांसह एकास बोरगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३४० रुपये किमतीचे डिझेल जप्त करण्यात आले आहे. केतन वैâलास धायबर (वय १८, रा. देहूगाव, विठ्ठलवाडी, ता. हवेली) याच्यासह दोन अल्पवयीन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.

शरद मांडवे यांचे बोरगाव गावच्या हद्दीत इंजिनिअरिंगचे दुकान असून तेथेच सायंकाळी त्यांचा जेसीबी व डंपर उभा असतो. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वाहनातून डिझेल चोरीस जाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे रात्री ते वर्कशॉपमध्ये मुक्कामी थांबत होते. रात्री त्यांच्या वाहनातून काही लोक डिझेल काढताना दिसले असल्याची फिर्याद शरद भरत मांडवे यांनी पोलिसात दिली आहे. 

दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रामचंद्र फरांदे, विजय देसाई, धनश्री मांडवे यांनी कारवाई केली. पुढील तपास बाबा महाडिक करत आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या