Satara News बैलांच्या अमानुष वाहतुकप्रकरणी गुन्हा दाखल


चार बैल व पिकअप असा एकूण ५.४० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

सातारा : वाई तालुक्यातील केंजळ येथून चार बैल पिकअपमधून अमानुषपणे डांबून त्यांची वाहतूक केल्याप्रकरणी महंमद अली सलीम कुरेशी (रा. सदर बझार, सातारा) याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या ताब्यातील चार बैल व पिकअप असा एकूण ५ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

केंजळ (ता. वाई) येथून चार बैल पिकअप गाडी (एमएच १२ एजी ४६१३) मधून अतिशय क्रूरपणे डांबून कत्तलीसाठी नेण्यात येत होते. ही बाब कळताच केंजळमधील शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी गाडीचा पाठलाग सुरु केला. मात्र गाडी न थांबवता तशीच वेगाने चालक पुढे नेत होता. शेवटी नागेवाडी (ता. सातारा) येथे पिकअपला थांबवण्यात कार्यकर्त्यांना यश आले.

एक अनोळखी आरोपी फरार

कार्यकर्त्यांनी गाडी बैलांसह सातारा तालुका पोलीस ठाण्यात आणली. त्यातील एकजण फरारी झाला होता. यावेळी गाडीसमवेत असलेला चालक महंमद अली सलीम कुरेशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या ताब्यातील पिकअप बैलांसह पोलिसांनी जप्त केली असून एक अनोळखी आरोपी अद्याप फरारी आहे. यावेळी तालुका पोलीस ठाण्यात शिवप्रतिष्ठान तसेच हिंदुत्ववादी कार्यकत्र्यांनी गर्दी केली होती. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी करत आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या