Satara News : जिल्हा बँकेच्या एटीएमचा जोशी विहीर येथे शुभारंभ


जिल्हा बँकेने सुरु केलेल्या विविध डिजिटल सेवांचा लाभ घ्या - डॉ. राजेंद्र सरकाळे

Satara News : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने तळागळातील शेतकरी सभासद तसेच खातेदारांसाठी आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध केल्या असून, एटीएम सुविधेमुळे ग्राहकांना निकडीच्या वेळेत तत्काळ पैसे काढता येणार आहेत. बँकेने सुरु केलेल्या विविध डिजिटल सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले.

जिल्हा बँकेच्या ओझर्डे शाखेंतर्गत जोशी विहीर (ता. वाई) येथील एटीएम मशिनच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भारती पिसाळ, अजित पिसाळ, बँकेचे व्यवस्थापक नाना लंगुटे, उपव्यवस्थापक महेश शिंदे, विश्वजित राजूरकर, विभागीय विकास अधिकारी संजय मांढरे, संजय जाधव, राहुल डेरे, पुरुषोत्तम डेरे, सचिन अनपट, प्रणय सोळस्कर, शैलेश चव्हाण, रवींद्र भिलारे, रामदास इबत्ती, नीलेश अंबिके उपस्थित होते.

राज्यात सर्वप्रथम युपीआय सेवा

संचालक मंडळाच्या प्रयत्नातून बँकेने महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम युपीआय व आधुनिक डिजिटल बँकिग सेवा उपलब्ध केली असून भीम युपीआयवर नोंदणी केली आहे. बँकेच्या ३२० शाखा व ४९ एटीएमच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे, असे डॉ. सरकाळे यांनी यावेळी सांगितले. 

बँकेच्या एटीएमसाठी जागा बांधून ती मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल उद्योजक धनंजय पिसाळ यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या