नाबार्डचे अध्यक्ष डॉ. जी. आर. चिंताला यांच्या हस्ते कर्जमंजुरी पत्रांचे वितरण
Satara News : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विकास सेवा संस्था सक्षमीकरणासाठी सतत प्रयत्न करीत असते. शेतकरी सभासदांना विकास सेवा संस्थांच्या माध्यमातून शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करून देते. संस्थांनी सभासदांना कर्ज वाटपाव्यतिरिक्त इतर व्यवसाय करून संस्था सक्षम करणे ही काळाची गरज आहे. नाबार्डच्या माध्यमातून देण्यात येणारी विविध योजना विकास सेवा संस्थांपर्यंत पोहचविण्याचे काम जिल्हा बँक करत असते.
नुकतेच नाबार्डने पॅक्स अॅज एमएससी (प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था तसेच बहुविध सेवा केंद्र) योजना जाहीर केली आहे. योजनेचा उद्देश योजनेमध्ये समावेश केलेला व्यवसाय सुरु करून संस्थांना सक्षम करणे. बँकेने योजनेची माहिती सर्व विकास सेवा संस्थाना दिलेली असून या योजनेअंतर्गत गोडाऊन बांधकाम, ट्रॅक्टर व औजारे खरेदीसाठी ड्रिप इरिगेशन व्यवसायासाठी जिल्ह्यातील केशवराव पाटील विकास सेवा संस्था (खटाव), रेठरे बुद्रुक विकास सेवा संस्था (रेठरे), हेळगाव विकास सेवा संस्था (हेळगाव), भैरवनाथ विकास सेवा संस्था (गुणवरे), डोंबाळवाडी विकास सेवा संस्था (डोंबाळवाडी), म्हासुर्णे विकास सेवा संस्था (म्हासुर्णे), कार्वे ग्राम विकास सेवा संस्था (कार्वे) या संस्थांचे नाबार्डकडून कर्ज प्रस्ताव मंजूर करून घेऊन दि. १३ जानेवारी रोजी बँकेच्या सभागृहात झालेल्या संस्था सक्षमीकरण कार्यशाळेत नाबार्डचे अध्यक्ष डॉ. जी. आर. चिंताला यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. बँक संस्था सक्षमीकरणासाठी करत असलेल्या कामकाजाबाबत डॉ. चिंताला यांनी समाधान व्यक्त केले.
जिल्हा बँकेचे मार्गदर्शन, सहकार्य
केशवराव पाटील विकास सेवा सोसायटी या संस्थेच्या अध्यक्षा इंदिरा घार्गे यांनी कर्जवाटप, व्यवसाय व अन्य कारणासाठी सातारा जिल्हा बँक सतत मार्गदर्शन, सहकार्य करीत असल्याचे स्पष्ट करुन सोसायटीला पॅक्स अॅज एमएससी योजनेअंतर्गत ड्रिप इरिगेशन व्यवसायासाठी नाबार्डने कर्ज मंजुरी केल्याबद्दल बँक व नाबार्डचे आभार व्यक्त केले.
कार्यशाळेस उपस्थित असलेले विविध विकास सेवा संस्थाचे चेअरमन, पदाधिकारी व सचिव यांनी जिल्हा बँक व नाबार्ड विकास सेवा संस्थांसाठी राबवीत असलेल्या विविध योजनाबाबत आपले मनोगत व्यक्त केले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या