नुसती चमकोगिरी कामाची नाही; झोकून देऊन काम केल्यानेच होतो सन्मान
Satara News : नुसती चकमोगिरी न करता कोरोनाचे आव्हान परतवून लावण्यासाठी झोकून देऊन काम केल्यानेच कोविड योद्धा म्हणून सन्मान होतो, हे कोरेगावकरांनी दाखवून दिल्याचे प्रतिपादन आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केले.
शहरातील प्रभाग क्रमांक ७, ८ व ९ मधील कोरोना योध्यांचा सन्मान नुकताच झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. मुख्याधिकारी विजया घाडगे, माजी उपसभापती उदयसिंह बर्गे, अॅड. चंद्रशेखर बर्गे, फत्तेसिंग बर्गे, प्रा. अनिल बोधे, नगरसेवक सुनील बर्गे, राजेंद्र बर्गे, प्रतापराव मोहिते, सुषमा निकम, उज्जवला निकम, अजय बर्गे, चंद्रकांत बर्गे, पोलीस पाटील दीपक शिंदे, बाळासाहेब बर्गे, डॉ. राजन काळोखे, डॉ. विनोद म्हसकर, डॉ. दीपक बनसोडे, राजेश दायमा उपस्थित होते.
प्रत्यक्षात मदत दिल्याने अनेकांचे प्राण वाचले
ऑगस्टमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढली होती. त्यामुळे स्वखर्चातून १०० बेडचे सुसज्ज रुग्णालय उभे केले. मोजक्या दिवसांत कोट्यवधी रुपयांची यंत्रणा उभी केली. जनतेसाठी जीवावर उदार होऊन झुंज देणारे माझे कुटुंबीय, मित्र, सहकारी, कोरेगावमधील व्यावसायिक, काही नगरसेवक यांनी मोठे योगदान दिले. प्रसिद्धीच्या मागे न लागता रुग्णांना प्रत्यक्षात मदत दिल्याने शेकडो लोकांचे प्राण वाचवू शकलो. रुग्णांची घरच्या माणसांप्रमाणे सेवा केल्याने कोरोनावर नियंत्रण आणण्यात आम्ही यशस्वी ठरलो. त्यामुळेच तुमच्याबरोबर कोविड योद्धा सन्मान स्वीकारताना मलासुद्धा आनंद होत आहे, परंतु एवढ्यावर थांबून चालणार नाही. पुढील काळातील आव्हाने परतवून लावण्यासाठी अशीच एकजूट आवश्यक आहे, असे आमदार शिंदे म्हणाले.
प्रारंभी शहरातील ५० नागरिक, नगरपंचायतीचे आरोग्य कर्मचारी, सोनेरी ग्रुप, संस्कृती प्रतिष्ठान, कोरेगाव विकास मंच या सामाजिक संस्थाचा कोविड योद्धा पुरस्काराने गौरव करण्यात आला. संतोष नलावडे यांनी प्रास्ताविक केले. माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, नगरसेविका शुभांगी बर्गे, श्रीकांत बर्गे, सागर दोशी यांनी स्वागत केले. माजी उपसरपंच राहुल बर्गे यांनी आभार मानले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या