Satara News : दहावी परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी बेविनार


दिशा अ‍ॅकॅडमी
तर्फे विद्यार्थी - पालकांसाठी ३१ जानेवारीपासून आयोजन

Satara News : महाराष्ट्रात अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असली तरी १० वी बोर्डाची परीक्षा देणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक हे अद्यापही भावनिक, मानसिक लॉकडाऊनमध्ये अडकल्याचे चित्र कमी अधिक प्रमाणात सर्वत्र पहायला मिळत आहे. भांबावलेल्या या वातावरणात पालक -विद्यार्थ्यांचा ताण हलका करण्यासाठी 'अभ्यास कसा करावा' याचे उत्तर देण्यासाठी आणि मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी वाईतील दिशा अ‍ॅकॅडमीने विविध विषयांचे मार्गदर्शन करणारे मोफत वेबिनार आयोजित केले आहेत. ३१ जानेवारी ते २१ मार्च दरम्यान प्रत्येक रविवारी हे प्रâी वेबिनार असणार आहेत. 

यात प्रत्येक्ष बोर्ड परीक्षेसाठी पेपर कसा सेट केला जातो, परीक्षकांच्या विद्यार्थ्यांकडून असलेल्या अपेक्षा, आदर्श उत्तरे कशी असावीत अशा विविध पातळीवर दहावी बोर्डाच्या पॅनलवर काम करणारे तज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. ज्यामुळे अभ्यासाचा ताण हलका होईलच शिवाय विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत जास्त मार्क मिळवू शकतील.

नाव नोंदवण्याचे आवाहन

३१ जानेवारी रोजी पहिला प्रâी वेबिनार प्रा. डॉ. नितीन कदम घेणार असून शेवटच्या ९० दिवसात दहावी बोर्ड परीक्षेचा अभ्यास कसा करायचा याबाबत मार्गदर्शन केले जाईल. पहिल्या वेबिनारसाठी नावनोंदणी आवश्यक असून नाव नोंदविलेले विद्यार्थीच पुढील वेबिनारमध्ये सहभाग घेऊ शकतील. नाव नोंदविण्यासाठी ७७७५९२५९२३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन दिशा अ‍ॅकॅडमीने केले आहे.

३१ जानेवारी ते २१ मार्च दरम्यान दर रविवारी संध्याकाळी ७ ते ८ दरम्यान होणार्‍या मोफत वेबिनारचे विषय व मार्गदर्शक तज्ज्ञ याप्रमाणे : ७ फेब्रुवारी (सायन्स) - प्रा. डॉ. सुलभा विधाते, १४ फेब्रुवारी (गणित) - प्रा. डॉ. दिलीप देशमुख, २१ फेब्रुवारी (इंग्लिश) - प्रा. डॉ. श्रृती चौधरी, २८ फेब्रुवारी (मराठी) - प्रा. डॉ. स्वाती ताडफळे, ७ मार्च (संस्कृत) - प्रा. डॉ. माधव भुस्कुटे, १४ मार्च (इतिहास) - प्रा. डॉ. गंगाधर रासगे, २१ मार्च (भुगोल) प्रा. श्री. नागपुरे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या