सलग ७२ तास पाठलाग करून गोव्याच्या सीमेवर अटक; मुद्देमाल जप्त
Satara News : शिरवळ, भुईंज परिसरात घरफोडी करणाऱ्या टोळीला शिरवळ पोलिसांनी गोवा राज्याच्या सीमेवर पाठलाग करुन पकडले. अटकेतील चौघांकडून दोन लाख ८३ हजार ७५० रुये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घरफोडी झाली होती. चोरट्यांनी या ठिकाणाहून ४ लाख ३० हजारांचा ऐवज चोरला होता. याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास करत राजकोट, मुंबई, सातारा, कराड, कोल्हापूर, आंबोली घाटमार्गे गोवा राज्यावर लक्ष केंद्रित केले. शिरवळ येथे घरफोडी करणाऱ्या टोळीचा मागमूस लागल्यानंतर पोलिसांनी त्यांना जेरबंद करण्यासाठीची तयारी सुरु केली.
तीन घरफोड्या केल्याची कबुली
सलग ७२ तास पाठलाग करत पोलिसांनी जोसेफ फर्नांडिस उर्फ साहिल सलीम खान (वय ३२, रा. मालाड वेस्ट, मुंबई), अब्दुल हमीद रशीद शेख (वय ३३), अब्दुल्ला जमीरऊल्ला पठाण (वय ३७), सुजित भगवान कांबळे (वय २८, तिघे रा. मानखुर्द, मुंबई) यांना गोवा राज्याच्या सीमेवर पकडले. चौकशीत त्या चौघांनी शिरवळ, भुईंज पोलीस ठाणे हद्दीत तीन घरफोड्या केल्याचे कबूल केले. उर्फ
या कारवाईत शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलीस रवींद्र कदम, जितेंद्र शिंदे, अमोल जगदाळे, स्वप्नील दौंड, नितीन महांगरे व प्रशांत वाघमारे सहभागी झाले होते. पुढील अधिक तपास शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे करीत आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या