Satara News : शेतकरी आंदोलनाला श्रमिक मुक्ती दलाचा पाठिंबा


शनिवारी महात्मा फुले यांच्या कुलभूमीत ठिय्या आंदोलन - डॉ. पाटणकर
 

Satara News : केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेण्याची शेतकर्‍यांची मागणी रास्त आहे. या कृषी कायद्यांना पर्याय देण्यासाठी व दिल्लीत सुरु असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महात्मा फुले यांच्या कटगुण या कुलभूमीत शनिवारी (दि. ९) श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती श्रमिकचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकाद्वारे दिली.

शेतकर्‍यांना उद्ध्वस्त करणारे कृषी कायदे रद्द झाले पाहिजेत. याबरोबरच महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या भूमिकेच्या पायावर नवे कृषी धोरण बनविण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव तयार केला पाहिजे. शेतकर्‍यांचे शोषण कायमचे संपविण्यासाठी कृषी धोरण झाले पाहिजे. वारा, सूर्यप्रकाश, समुद्राच्या लाटा, पाणी या नैसर्गिक संसाधनांचा उपयोग सामुदायिक तत्त्वावर करण्यासाठी केंद्र शासनाने १०० टक्के गुंतवणूक करुन जनतेच्या ताब्यात दिले पाहिजे. शेती उत्पादन घेण्यासाठी आवश्यक पाणी भूमिहीन शेतकर्‍यांसह सर्वांना बंद पाइपलाइनने देण्यासाठी यंत्रणा उभी केली पाहिजे, असे पत्रकात म्हटले आहे.

आंदोलनात सहभागी होणार

राज्यात श्रमिक मुक्ती दल - पाणी संघर्ष चळवळीने ३० वर्षांच्या संघर्षातून सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील तीन तालुक्यांमधील सर्व कुटुंबांना शेतीसाठी पाणी देण्याची योजना राबवण्यासाठी सरकारला भाग पाडले. जंगले आणि ओढे - नद्यांसारख्या प्रवाहांना पर्यावरणीय समृद्धीच्या दृष्टीने सुदृढ ठेवण्यासाठी जंगल परिसरातील नदी खोर्‍यामधील आदिवासी आणि बिगर आदिवासी शेतकरी - मजुरांच्या नियंत्रणात देणे आवश्यक आहे. यामधून शेतकर्‍यांचे शोषण संपणार आहे. त्यामुळे शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हावेत, या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनात आम्ही ही भूमिका घेऊन सहभागी होणार असल्याचेही श्रमिक मुक्ती दलाने म्हटले आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या