Satara News : रानडुकराच्या मांसाची विक्री करणाऱ्याची ‘शिकार’


अतितजवळ वनविभागाची कारवाई; ७० किलो मांसासह रंगेहात पकडले

Satara News : रानडुकराची शिकार करुन त्याच्या मांसाची विक्री सातारा तालुक्यातील अतित परिसरात होत असल्याची माहिती स्थानिक खबऱ्याकडून मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करुन कारवाई केली. यावेळी रानडुकराचे मांसाचे तुकडे असणारे ७० किलो मटण जप्त करीत याप्रकरणी सचिन तुकाराम ताटे (रा. समर्थनगर, ता. सातारा) याला रंगेहाथ पकडण्यात आले.

अतित येथे रानडुकराची शिकार करुन त्याच्या मांसाचे तुकडे करुन त्याची विक्री सुरु असल्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करुन ही कारवाई केली. अतित ते खोडद या रस्त्यालगत असणाऱ्या एका शेतामध्ये रानडुकराच्या मांसाचे तुकडे करुन ठेवले होते. ते अंदाजे ७० किलो वजनाचे होते.

यावेळी रानडुकराच्या पायाची खुरे ८, लोखंडी तराजू १, वजने १ किलो, ५०० ग्रॅम, २०० ग्रॅम, १०० ग्रॅम प्रत्येकी एक, चाकू २, मोटारसायकल २, मोबाईल १ आदी साहित्यासह आरोपी सचिन तुकाराम ताटे (रा. समर्थनगर, ता. सातारा) याला रंगेहाथ पकडले. 

सातारा उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा, सहाय्यक वनसंरक्षक विजय गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत वनपाल कुशाल पावरा, वनरक्षक राजकुमार मोसलगी, वनरक्षक सुहास भोसले, संजय धोंडवड, मारुती माने, गोरख शिरतोडे, वाहनचालक संतोष दळवी हे सहभागी झाले होते.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या