Satara News : रहिमतपूर नगरपरिषदेने उभारलेल्या घरकुलांचे लोकार्पण


अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील ४८ कुटुंबांना मिळाले स्वत:चे हक्काचे घर
 

Satara News : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर नगर परिषदेने रमाई घरकुल योजनेंतर्गत उभारणी केलेल्या आदर्श घरकुलांचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील ४८ कुटुंबांना स्वत:चे हक्काचे घर उपलब्ध करुन देऊन नगर परिषदेने अतिशय उत्तम काम केले आहे, अशा शब्दात प्रशंसा करत, नगर परिषदेमार्फत घेण्यात येणार्‍या विकास कामांना शासनामार्फत आणखी निधी देण्यात येईल, असे आश्वासन जयंत पाटील यांनी यावेळी दिले.

रमाई घरकुल योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या ४८ घरकुलांचे वाटप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, रहिमतपूरचे नगराध्यक्ष आनंदा कोरे, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे, उपनगराध्यक्षा सुरेखा माने, मुख्याधिकारी संजीवनी दळवी, जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, सुनिल माने, सारंग पाटील आदी उपस्थित होते.

नगर परिषदेने उत्तम उदाहरण घालून दिले

आजच्या काळात लोकसंख्येच्या वाढत्या प्रमाणात गरीबांना घरे उपलब्ध करुन देणे जिकिरीचे झाले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध घरकुल योजना आहेत. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी टीम वर्क झाले तर एक चांगले काम होऊ शकते याचे उत्तम उदाहरण रहिमतपूर नगर परिषदेने घालून दिले आहे, असे उद्गार जयंत पाटील यांनी यावेळी काढले. शिक्षणामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती होते. या घरकुलातील व्यक्तींनी आपल्या मुलांना शिकवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

अपुरे प्रकल्प पूर्ण करण्यावर शासनाचा भर

रहिमतपूर नगर परिषदेने रमाई घरकुल योजनेंतर्गत एक चांगली व सुसज्ज अशी वास्तु उभी केली आहे. रहिमतपूर परिसरात दळणवळणाची साधने वाढत असून भविष्यात येथील बाजारपेठही वाढणार आहे. सहकार व पणन विभागाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना न्याय देण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. राज्यातील अपुरे प्रकल्प पूर्ण करण्यावर शासनाने भर दिला असून जिल्ह्यातील विकास कामांना गती दिली जाईल, असे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमामध्ये नगराध्यक्ष आनंदा कोरे, सुनिल माने यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात नगर परिषदेच्या मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी रमाई घरकुल योजनेची माहिती दिली. या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या