Satara News : माजी सैनिकाच्या कुटुंबावर गावगुंडांचा हल्ला


तक्रार देऊनही दखल नाही; कारवाई न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा

Satara News : सातारा तालुक्यातील लिंंब येथील माजी सैनिकाच्या कुटुंबावर त्याच गावातील गावगुंडांनी हल्ला केला. याबाबत तक्रार देवूनही यंत्रणेकडून कोणतीच दखल घेतली नाही. या मारहाणीत माजी सैनिकाच्या सूनेचा गर्भपात झाला आहे. याप्रकरणी संशयितांवर कारवाई करण्यासाठी उपोषण व आत्मदहन करण्याचा इशारा समता माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी माजी सैनिक प्रकाश भोसले म्हणाले, दि. १९ रोजी राजन भोसले याच्यासह अन्य चौघांनी मारहाण केली. यामध्ये भांडण सोडवण्यास आलेल्या त्यांच्या सून प्रतिक्षालाही संशयितांनी मारहाण केली. यामध्ये तिचा गर्भपात झाला. यानंतर सर्व कागदपत्रे देवून सातारा तालुका पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. याप्रकरणी फक्त माझीच तक्रार नोंदवून घेतली आहे.

अन्यायाच्या विरोधात संघटना सरसावल्या

दरम्यान, या अन्यायाच्या विरोधात जिल्ह्यातील विविध माजी सैनिक, समता माजी सैनिक संघटना पुढे सरसावल्या असून त्यांनी याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख, जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.

याप्रकरणी न्याय न मिळाल्यास दि. १२ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भोसले कुटुंबियांसह जिल्ह्यातील माजी सैनिक बेमुदत उपोषण करणार आहेत. तसेच आत्मदहन आंदोलनही करण्याचा इशारा दिला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या