लसीमुळे आरोग्य क्षेत्रात काम करणारे अधिकारी - कर्मचारी आनंदित
Satara News : सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत आज क्ष - किरण वैज्ञानिक अधिकारी बाळासाहेब विष्णू खरमाटे यांना पहिली कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. या लसीमुळे आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असल्याच्या भावना पालकमंत्री पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या.
यावेळी बाळासाहेब पाटील यांनी लसीकरण प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष व निरीक्षण कक्षाची पाहणी करुन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले, नगराध्यक्ष माधवी कदम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
प्रतिदिन १०० लाभार्थ्यांना लस
पहिल्या टप्प्यात शासकीय व खासगी आरोग्य संस्था अंतर्गत कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात पोलीस विभाग, सैन्य दल, हवाई दल व तिसऱ्या टप्प्यात सर्वसामान्य नागरिकांना लस देण्यात येणार आहे. ही लस जिल्ह्यातील ९ ठिकाणी देण्यात येणार असून या ९ ठिकाणी प्रत्येक दिवशी १०० लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे. लस घेतल्यानंतर ३० मिनिटे निरीक्षणही करण्यात येणार आहे, असे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
कराडला देसाई यांच्या उपस्थितीत शुभारंभ
कराड उपजिल्हा रुग्णालय येथे कोरोना प्रतिबंधक लस देण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, कराडच्या नगराध्यक्ष रोहिणी शिंदे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आमदार दीपक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या जिजामाला नाईक - निंबाळकर उपस्थित होत्या.
कोरेगाव ग्रामीण रुग्णालयात कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना प्रतिबंधक लसीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. वाई येथे आमदार आमदार मकरंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मिशन हॉस्पिटलमध्ये धन्वंतरी पूजन आणि कर्मचाऱ्यांना लस देऊन लसीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, तहसीलदार रणजीत भोसले, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. सतीश बाबर, 'निमा'चे डॉ. शेखर कांबळे, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे डॉ. शैलेश धेडे, मिशन हॉस्पिटलचे प्रशासक रॉबर्ट मोझेस, नगरसेवक भारत खामकर, वासंती ढेकाणे, रेश्मा जायगुडे, रुपाली वनारसे, प्रदीप जायगुडे, लसीकरण मोहीम प्रमुख डॉ. सुधाकर भंडारे, अजित वनारसे, डॉ. मदन जाधव, विठ्ठल भोईटे, अप्पासाहेब पाटील आदी उपस्थित होते. दहिवडी ग्रामीण रुग्णालयात आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीचा शुभारंभ करण्यात आला.
लसीकरणाने कसलाही त्रास नाही
लसीकरणाचा मला आज लाभ मिळाला. त्याबद्दल मला आनंद वाटत आहे. मला कसलाही त्रास जाणवत नाही, यापुढे कोरोना मुक्तीच्या कामासाठी आणखी जोमाने काम करणार असल्याचा निर्धार जिल्ह्यातील पहिली कोरोना प्रतिबंधक लस घेणारे क्ष -किरण वैज्ञानिक अधिकारी बाळासाहेब विष्णू खरमाटे यांनी व्यक्त केला.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या