सावधानता बाळगण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे पोल्ट्री चालकांना आवाहन
Satara News : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशात उत्तरेकडे बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. सातारा जिल्ह्यातही स्थलांतरित पक्ष्यांमुळे हा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे पोल्ट्री चालकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
वन विभाग आणि जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचा सहभाग घेऊन बर्ड फ्लू रोखण्याचे प्रयत्न सुरु आहेत. स्थलांतरित पक्ष्यांमध्ये हा आजार आढळून आला होता. मायणी तलावाकडे स्थलांतरित पक्षी येत असतात. फार मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचा मृत्यू होत असेल तर पशुवैद्यकीय दवाखान्यात माहिती द्यावी. आठवडी बाजार, कत्तलखाने यांच्या बाबतीत काळजी घेतली जात आहे. परिस्थितीला चांगल्या रितीने तोंड देत आहोत. पोल्ट्रीचे मार्केट येथे लक्ष आहे. सध्या घाबरुन जाण्याची गरज नाही. असा प्रसंग दिसला तर नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कळवा, असे आवाहन शेखर सिंह यांनी केले आहे.
शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी
रोग पसरु नये यासाठी शासनाकडून ४ जानेवारीस मार्गदर्शक सूचना जारी झाल्या आहेत. दरम्यान, आधीच कोरोना संसर्ग काळात कोंबड्यांमुळे कोरोना पसरत असल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे व्यावसायिक अडचणीत आले होते. आता पुन्हा नवे संकट आले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या