Satara News : मिलिटरी अपशिंगेनजीक अवैध गांजा पकडला


सापळा रचून दोघांना अटक; ४४ हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत

Satara News : सातारा तालुक्यातील अपशिंगे (मिलिटरी) गावानजीक अवैधरित्या गांजा विक्रीसाठी घेऊन निघालेल्या दोघांना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. संशयितांकडून गांज्यासह सुमारे ४४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

बाळू हणमंत चव्हाण (वय ४३, रा. सातारारोड, ता. कोरेगाव) व नाना महादेव मसुगडे (वय ५०, रा. अपशिंगे मिलिटरी, ता. सातारा) अशी संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. 

अपशिंगे (मिलिटरी) गावच्या हद्दीतून दोघेजण चोरुन गांजा विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती बोरगाव पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी अपशिंगे (मिलिटरी) ते देशमुखनगर जाणार्‍या रस्त्यालगत वाघजाई मंदिराजवळ सापळा रचला. यावेळी एका दुचाकीवरुन आलेल्या दोन व्यक्ती तिथे आढळल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांना या दोघांजवळ एक प्लॅस्टिक पोते आढळले. त्याची झडती घेतली असता त्या पोत्यात गांजा असल्याचे निदर्शनास आले.

विक्रीसाठी घेऊन जाताना सापडले

त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता हा गांजा सातारा येथे विकण्यासाठी घेऊन जात असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडून चार किलो वजनाचा गांजा, एक दुचाकी व तीन मोबाईल्स असा ४४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या दोघांना अटक करण्यात आली आहे. 

या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ, हवालदार मनोहर सुर्वे, किरण निकम, स्वप्नील माने, विजय साळुंखे, राहुल भोये, विशाल जाधव, अमित पवार, हणमंत पवार, मांडवे तसेच सातारा येथील अतिरिक्त तहसीलदार सोपान टोपे यांनी सहभाग घेतला.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या