डॉ. हमीद दाभोलकर यांच्या साहित्यकृतीचा सन्मान; पुरस्कार मिळणार घरपोच
Satara News : उत्कृष्ठ मराठी वाड:मय निर्मितीसाठी देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली असून त्यामध्ये येथील डॉ. हमीद दाभोलकर यांचा समावेश आहे.
राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या या पुरस्कार योजनेअंतर्गत सन २०१९ च्या पुरस्कार स्पर्धेसाठी राज्यातून १ हजार ७३ प्रवेशिका मंडळाकडे प्राप्त झाल्या होत्या. समितीकडे पुस्तके परीक्षाणार्थ व शिफारशी करण्यासाठी सोपवण्यात आल्या होत्या. समितीने या शिफारशी केल्यानंतर डॉ. हमीद दाभोलकर यांच्या 'विवेकाच्या वाटेवर' या पुस्तकासाठी राज्य शासनाचा राज्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना थेट घरपोच प्रदान करण्यात येणार आहे. पारितोषिकांची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे मराठी भाषा विभागाने स्पष्ट केले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या