दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणातून कृत्य; चावा घेऊन केले जखमी
Satara News : दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरुन वडिलांना मारहाण करत जखमी केल्याप्रकरणी खोकडवाडी (ता. सातारा) येथील अमोल मदन सावंत (वय ३६) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
खोकडवाडी येथे मदन अमृत सावंत (वय ७२) हे कुटुंबीयांसमवेत राहण्यास आहेत. ते शेतात काम करत होते. या ठिकाणी त्यांचा मुलगा अमोल हा आला. त्याने वडिलांकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले. वडिलांनी दारु पिण्यास पैसे देण्यास नकार दिला. यामुळे चिडलेल्या अमोलने वडील मदन यांच्याशी वाद घातला. वाद घालूनही पैसे मिळत नसल्याने अमोलने वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरु केली. मारहाण करतानाच त्याने चावा घेऊन वडिलांना जखमी केले.
याची तक्रार मदन सावंत यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवली असून, अमोल सावंत याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या