सनईचे मंजूळ स्वर, तुतार्यांचा निनाद, फुलांची आरास यामुळे अजिंक्यतारा शिवमय
Satara News : झेंडूच्या फुलांनी सजवलेला किल्ले अजिंक्यतारा, राजसदरेवर काढलेल्या रांगोळ्या, सनईचा मंजूळ स्वर, तुतार्यांचा निनाद अशा शिवमय वातावरणात किल्ले अजिंक्यातार्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक व सातारा शहराचा स्थापना दिन तथा स्वाभिमान दिन शाही पद्धतीने उत्साहात पार पडला.
या दिवसाचे औचित्य साधून किल्ले अजिंक्यतार्यावर इतिहासात प्रथमच नगरपालिकेची विशेष सभा पार पडली. छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करणारे अजय जाधवराव, राजुशेठ राजपुरे यांचा सातारा भूषण पुरस्कार देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
किल्ले अजिंक्यतार्यावर ३०० वा स्वाभिमान दिन व शिवराज्याभिषेक उत्सव समितीच्यावतीने ११ व्या वर्षी स्वाभिमान दिन उत्साहात शाही पद्धतीने साजरा करण्यात आला. या उत्सवासाठी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, बांधकाम सभापती सिद्धी पवार, पाणी पुरवठा सभापती सीता हादगे, महिला व बालकल्याण सभापती रजनी जेधे, नियोजन सभापती स्नेहा नलावडे, सुजाता राजेशिर्के, स्मिता घोडके, किशोर शिंदे, श्रीकांत आंबेकर, अॅड. दत्ता बनकर, शेखर मोरे-पाटील, निशांत पाटील, बाळासाहेब ढेकणे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे, शिवराज्यभिषेक उत्सव समितीचे मार्गदर्शक दीपक प्रभावळकर, संस्थापक अध्यक्ष सुदामदादा गायकवाड, कन्हैय्यालाल राजपुरोहित, सामाजिक कार्यकर्ते रवी पवार, शिवसेनेचे सातारा शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, दीपक भुजबळ, शिवभक्त अभि सुर्वे, मंगेश काशिद, सातारा सायकल ग्रुपचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
माथा टेकवून गडाला वंदन
किल्ले राजधानी अजिंक्यतार्याचे प्रवेशद्वार स्वाभिमान दिनानिमित्ताने सजवण्यात आले होते. स्वाभिमान दिनानिमित्ताने येणार्या शिवभक्तांचे स्वागत गडावर सनईच्या मंजूळ अशा स्वरांनी केले जात होते. गडाला माथा टेकून शिवभक्त गडावर उत्सवाच्या ठिकाणी पोहचत होते. कार्यक्रमाची उंची संदीप मंहिद गुरुजी, दीपक प्रभावळकर यांच्या शब्दांनी वाढत होती. इतिहासकार अजय जाधवराव यांनी छत्रपत शाहू महाराज आणि अजिंक्यतारा व शाहू महाराजांची समाधीबाबत माहिती सांगून स्फुरण चेतवले.
बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने १ लाख रुपयांची मदत
किल्ले अजिंक्यतार्याला उर्जिंतावस्था आणण्यासाठी नगरपालिकेने घेतलेल्या ठरावानंतर बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे राजेंद्र चोरगे यांनी १ लाख रुपये देण्याची घोषणा केली. छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीचा जीर्णोध्दार करणारे अजय जाधवराव, राजू शेठ राजपुरे यांना राजेंद्र चोरगे, नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, अॅड. दत्ता बनकर, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या उपस्थितीत तलवार देवून सन्मानित करण्यात आले. शंकरराव पुंभार, शरद पवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या