अक्षता पडण्यापूर्वीच पोहोचले पोलीस; ‘अठरा’नंतर शुभमंगल करण्याचे केले कबूल
Satara News : खंडाळा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन युवतीचा होणारा विवाह शिरवळ पोलिसांनी रोखला. या घटनेमुळे संपूर्ण खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
वाई तालुक्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न सोलापूर जिल्ह्यातील एका २२ वर्षीय युवकाशी शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमधील एका गावात नातेवाईकांच्या घरासमोर करण्याचे ठरविले होते. संबंधित ठिकाणी लग्नाची जोरदार तयारी करण्यात आली होती.
संबंधित लग्न समारंभातील नियोजित वधू ही अल्पवयीन असून तिचे वय अवघे १६ वर्षे असल्याची माहिती शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तातडीने पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांच्या पथकाला लग्नसमारंभाच्या ठिकाणी जाण्यास सांगितले.
वयाचा पुरावा मागितला
वधू - वरावर अक्षता पडण्याची वेळ जवळ आली असताना शिरवळ पोलिसांनी मंडपात दाखल होत संबंधित वधूची चौकशी करीत वयाचा पुरावा पाहिला. यावेळी संबंधित वधू ही सोळा वर्षाची असल्याचे निदर्शनास आले. पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, शिरवळ पोलिसांनी दोन्हीकडील नातेवाईकांचे समुपदेशन केल्यानंतर विवाह समारंभ हा युवतीचे वय कायद्याप्रमाणे पूर्ण झाल्यानंतर करण्याचे नातेवाईकांनी कबूल केले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या