साठेखत करून दिलेली जमीन नावावर करून देण्यास टाळाटाळ
Satara News : उसने पैसे घेताना साठेखत करुन दिलेली जमीन नावावर न करुन देता फसवणूक केल्याप्रकरणी भरतगाववाडी (ता. सातारा) येथील उत्तम तुकाराम घाडगे, सचिन उत्तम घाडगे यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
करंजे येथील निसर्ग कॉलनीत राहणार्या आशा दीपक कांबळे यांची संशयितांशी ओळख होती. त्या दोघांनी आम्हाला पैशाची गरज असून, ते तुम्ही आम्हाला द्या, त्याबदल्यात आम्ही भरतगाववाडी येथील आमच्या ३० गुंठे जागेचे साठेखत तुम्हाला करुन देतो, असे सांगितले. यानुसार साठेखत करुन देत त्या दोघांनी २०१३ ते दि. २० जानेवारी २०२१ या काळात वेळोवेळी कांबळे यांच्याकडून सहा लाख रुपये घेतले.
पैसे घेत असताना त्या दोघांनी संबंधित जमीन कुळकायद्याची असून, त्याची परवानगी काढून घेतो व ती ६ महिन्यांत तुमच्या नावावर करुन देतो, असे कांबळे यांना सांगितले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने कांबळे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार उत्तम घाडगे, सचिन घाडगे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या