धार्मिक विधी पुजारी व विश्वस्तांनीच पार पाडण्याचे निर्देश
Satara News : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने वाई तालुक्यातील मांढरदेव येथील काळूबाई देवी यात्रा व सुरूर येथील धावजी बुवा यात्रा यात्रा आयोजित करण्यास मनाई करण्यात आली असून या यात्रेनिमित्त जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी १६ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत फौजदारी दंड संहिता प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ आदेश लागू केले आहेत.
या आदेशानुसार या दोन्ही ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होणार नाही अशा धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणुकांचे आयोजन करण्यात येऊ नये. यात्रेतील धार्मिक कार्यक्रम मंदिराचे पुजारी व ट्रस्टचे सदस्य यांनीच पार पाडावेत. त्याव्यतिरिक्त इतर व्यक्तींना कार्यक्रमास उपस्थित राहण्यास मनाई असेल. तसेच यात्रा कालावधीत ट्रस्टी व पुजारी वगळून इतर व्यक्तींना मंदिर दर्शनासाठी बंद असेल.
दहा किलोमीटरमध्ये गर्दी करण्यास मनाई
यात्रा कालावधीत भाविकांना तसेच स्थानिकांना रहिवासासाठी तंबू उभारण्यास तसेच पशू व पक्षी यांचा बळी देण्यास मनाई करण्यात आली आहे. १६ जानेवारी ते १४ पेâब्रुवारी या कालावधीत मांढरदेव गावासह मांढरदेव गावापासून १० किलोमीटर परिसर, परखंदी, डुईचीवाडी, पिराचीवाडी, बालेघर, सुलतानपूर, लोहारे, वेरुळी, मुंगसेवाडी, सटालेवाडी, एमआयडीसी वाई, शहाबाग, अंबाडे खिंड, बोपर्डी, धावडी फाटा रेणुसेवस्ती, गुंडेवाडी, कोचळेवाडी, काळुबाई मंदिर जमदाडे वस्तीशेजारी, वाई शहर व सुरुर तसेच खंडाळा तालुक्यातील कर्नवडी, झगलवाडी, अतिट व लिंबाचीवाडी येथील सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर मोठ्या संख्येने एकत्र येणे अथवा गर्दी करण्यासही मनाई करण्यात आली आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या