Satara News : ज्यांनी जमिनी दिल्या त्यांचे स्मरण ठेवा - रामराजे


कराड तालुक्यातील खोडजाईवाडी येथे तलावाच्या भूसंपादन निधीचे वितरण

Satara News : पाण्यामुळे कृषी व औद्योगिक क्रांती होते. शेतकऱ्यांच्या त्यागातून जिल्ह्यात अनेक धरणे झाली आहेत. त्या धरणांचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी याचे स्मरण ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक - निंबाळकर यांनी केले. 

कराड तालुक्यातील खोडजाईवाडी येथे साठवण तलावाच्या भूसंपादन निधीचे वितरण व विविध विकास कामांच्या भूमिपूजन व उद्घाटन समारंभात प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, प्रांताधिकारी उत्तमराव दिघे, तहसिलदार अमरदीप वाकडे, जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, पंचायत समिती सभापती प्रणव ताटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, प्रभाकर देशमुख, जसराज पाटील, तानाजी साळुंखे, अजित पाटील, संगीता साळुंखे आदी उपस्थित होते. 

खोडजाईवाडी येथील शेतकऱ्यांना भूसंपादनाचा धनादेश मिळत आहे. या पैशाचा सदुपयोग आपल्याबरोबर आपल्या पुढच्या पिढीसाठी करावा. खोडजाईवाडी येथे झालेल्या साठवण तलावामुळे परिसराचा विकास झाला आहे. शेतकऱ्यांनी येथील पाण्याचा योग्य तो उपयोग करावा, असे आवाहन रामराजे यांनी यावेळी केले.

पाणी मिळाल्याने ऊसक्षेत्रात वाढ

खोडजाईवाडी येथील साठवण तालावाचे काम चांगले झाले असून यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती झाली आहे. ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांच्या चेहऱ्यावरही आज आनंद दिसत आहे. याच परिसरात ओढाजोड प्रकल्पही राबविण्यात आला होता. त्याचा परिणाम चांगला दिसत असून येथील ऊसाचे क्षेत्र वाढले आहे, असे बाळासाहेब पाटील म्हणाले.

शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे असा सल्ला खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिला. कार्यक्रमात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा खोडजाईवाडी ग्रामस्थांच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी, विविध गावांचे सरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या