पती, सासरे यांच्यासह सहा जणांविरूध्द सातारा शहर पोलिसात गुन्ह्याची नोंद
Satara News : येथील गुरुवार पेठेतील एका विवाहितेचा दि. २२ एप्रिलपासून शारीरिक, मानसिक छळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तसेच सासर्यांनी विनयभंग केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पती, सासरे, नणंद यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
यातील तक्रारदार विवाहिता रुबिना तौसिफ शेख (रा. गुरुवार पेठ, सातारा. सध्या रा. दिव्यनगरी, कोंडवे, ता. सातारा) हिला 'तू रोगट आहेस, तुला मूल होत नाही, तुझा पायगुण चांगला नाही, तुझ्यामुळे सासूला कॅन्सर झाला तर पतीला अॅटॅक आला' असा आरोप करत सासरच्या लोकांनी शारीरिक, मानसिक दळ केला तसेच मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली. सासरे सलीम इस्माईल शेख यांनी तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत विनयभंग केल्याची तक्रार रुबिना यांनी दिली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी पती तौसिफ सलीम शेख, सासरे सलीम शेख, नणंद शगुसा जमीर पठाण, जमीर पठाण, नणंद आसमा मोहसीन मुल्ला (सर्व रा. गुरुवार पेठ, सातारा) व रफीक शेख (रा. शाहूनगर, सातारा) यांच्याविरुद्ध जाचहाट तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक दगडे करत आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या