आणि कोकरांचा जीव घेणारे तरसच होते यावर झाले शिक्कामोर्तब
Wild Life News : कराड तालुक्यातील रेठरे खुर्द गावाजवळ आज तरसांनी मेंढरांच्या छावणीत घुसून सात कोकरांचा बळी घेतल्याच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दिवसभर शिवारात गुराढोरांसह, शेळ्यामेंढ्यांसह जाणाऱ्या शेतकरी, मेंढपाळांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पण त्याचवेळी आजच्या घटनेत कोकरांवर हल्ला करणारे वन्य प्राणी तरसच होते कशावरून असा प्रश्नही अनेकांना पडला.
कोकरांवर हल्ला झाला, त्यावेळी त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी म्हणून मेंढपाळाच्या कुटुंबातील महिला होत्या. पण त्यांनाही हा वन्य प्राणी कोणता ते माहीत नव्हते. घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी - कर्मचारी पोहोचले तेव्हा त्यांनी, हल्ला करणारा बिबट्या होता का म्हणून विचारले असता या महिलांनी स्पष्टपणे नाही असे उत्तर दिले.
... अशा पध्दतीने झाले शिक्कामोर्तब
मग त्यांना प्राण्याचे वर्णन विचारले असता त्यांनी त्यांच्या पध्दतीने त्या प्राण्यांचे वर्णन सांगितले. त्या वर्णनावरून वन विभागाचे लोक एका निष्कर्षाप्रत आलेच होते. पण तरीही त्यांनी मग तरसाचे फोटो त्या महिलांना दाखवले. त्यावेळी त्या महिलांनी ‘होय, हेच ते प्राणी’ असे सांगितले. अशा पध्दतीने कोकरांचा जीव घेणारे ते वन्य प्राणी तरसच होते यावर शिक्कामोर्तब झाले. सर्वांची खात्री पटली.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या