दोन पंतप्रधानांच्या हस्ते सन्मान, तत्कालीन राष्ट्रपतींकडूनही कौतुक झालेले अधिकारी
Mahavitaran News : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून विजय सिंघल यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी ते ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त व त्याआधी बृहन्मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते.
विजय सिंघल हे भारतीय प्रशासन सेवेतील १९९७ च्या बॅचचे अधिकारी असून त्यांनी आयआयटी रुरकीमधून स्थापत्य या विषयात अभियांत्रिकी पदवीचे सुवर्णपदक पटकाविले आहे. सोबतच आयआयटी दिल्लीमधून बिल्डींग सायन्स व कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट ही एमटेक आणि लंडन येथे पब्लिक सर्विसेस पॉलिसी व मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी मिळविली आहे.
या अगोदर त्यांनी जिल्हाधिकारी (हिंगोली, जळगाव), मुख्य कार्यकारी अधिकारी (अहमदनगर, संभाजीनगर महानगरपालिका), आयुक्त (ठाणे, कोल्हापूर), अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (मुंबई) तसेच साखर आयुक्त, उद्योग आयुक्त म्हणून महत्वाच्या पदांवर काम केले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल
नाविन्यपूर्ण व लोकाभिमुख प्रशासनासाठी आग्रही असलेले विजय सिंघल यांना जळगाव जिल्ह्यातील नदीजोड प्रकल्पाच्या कामगिरीसाठी प्राईम मिनिस्टर अवॉर्ड एक्सलेन्स इन पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन हा पुरस्कार तत्कालिन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. या नदीजोड प्रकल्पातील कामगिरीची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली होती. तसेच विशेष निमंत्रणावरून त्यांनी ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) व न्यूयॉर्क (यूएसए) येथे आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये नदीजोड प्रकल्पावर व्याख्यान दिले आहे. या प्रकल्पाचे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनीदेखील कौतुक केले आहे.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत भारतातील ‘सर्वात स्वच्छ राज्याची राजधानी’ या विभागात मुंबई शहरासाठी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. सार्वजनिक क्षेत्रात उत्कृष्ट प्रशासनामध्ये विविध डिजिटल उपक्रम, ऑनलाईन यंत्रणा आदींसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचे सुवर्णपदक, रौप्यपदक तर केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या