१० महिन्यांपासून एकदाही बील न भरणाऱ्यांची वीज तोडणार
Mahavitaran News : गेल्या दहा महिन्यांत बारामती परिमंडलातील ४ लाख ८१ हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांनी एकदाही वीज बील न भरल्यामुळे महावितरणची आर्थिक परिस्थिती मेटाकुटीला आली असून, वीज खरेदी व वितरण करणे मुश्किल बनले आहे. परिणामी अशा थकबाकीदारांचा वीजपुरवठा तोडून वसुली करण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याने महावितरणने या ग्राहकांचा वीजपुरवठा तोडण्याचा कठोर निर्णय घेतला आहे.
लॉकडाऊनच्या काळात जनता घरात असताना महावितरणचे कर्मचारी वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी जीवाची पर्वा न करता झटत होते. लॉकडाऊनमध्ये घरगुती ग्राहकांची वीज मागणी रेकॉर्डब्रेक होती. त्यात रिडींग व वीजबिलाची छपाई बंद असल्याने ग्राहकांना छापील बिलाऐवजी मोबाईल मेसेजवर बिले देण्यात आले. ही बिले सरासरीने व कमी होती. प्रत्यक्षात जून महिन्यापासून रिडींग सुरु होताच रिडींगनुसार बिले देण्यात आली. मात्र यापूर्वीची बिले न भरल्याने थकबाकी वाढत गेली. त्यासाठी थकबाकीचे हप्ते करण्यात आले. एकरकमी भरणाऱ्यांना सवलत देण्यात आली. बिलातील शंका दूर करण्यासाठी https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ ही लिंक देऊन प्रत्येकाला त्याचा वापराचा हिशोब दिला.
वीजग्राहकांच्या तक्रारी किंवा शंका निरसन करण्यासाठी राज्यभरात ३२०१ वेबिनार, ५६७८ मेळावे घेण्यात आले होते. तसेच १५५२४ मदत कक्ष सुरु करण्यात आले होते. त्यापैकी १७४२ मदत कक्ष अद्यापही सुरु असून, त्यातून आलेल्या ९८०४९९ पैकी ९३३३२४ तक्रारींचे निवारण सुध्दा केलेले आहे.
५१८ कोटी रुपये थकित
बारामती परिमंडलामध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील जवळजवळ १० लाख ग्राहकांकडे ५१८ कोटी रुपये थकीत असून त्यातील दहा महिन्यांत एकदाही वीज बील न भरणारे ४ लाख ८१ हजार ग्राहक असून, त्यांच्याकडे ३४० कोटी येणेबाकी आहे. विनंत्या, आवाहन करुनही रक्कम वसुली झाली नसल्याने आता वीज कायद्यातील तरतुदीनुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही सुरु झालेली आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


0 टिप्पण्या