Mahesh Kothare News : महेश कोठारे यांना ‘कलायात्री पुरस्कार’ जाहीर


कोल्हापूरच्या शाहू स्मारक भवनात १ मार्च रोजी समारंभपूर्वक वितरण

Mahesh Kothare News : नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या स्मरणार्थ १ मार्च रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ‘नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार’ सोहळा साजरा होतो. त्यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त यंदाचा अकरावा कलायात्री पुरस्कार निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते महेश कोठारे या उमद्या व्यक्तिमत्वाला देण्यात येणार आहे. १ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथील मुख्य सभागृहात हा सोहळा होणार आहे. 

गेली ३५ वर्षे वेगवेगळ्या सांस्कृतिक उपक्रमाद्वारे जयशंकर दानवे या कलाकाराचे स्मरण दानवे परिवारातर्फे केले जाते. या पुरस्कारातून त्यांच्या स्मृती जपल्या जात आहेत. २०११ सालापासून हे कलायात्री पुरस्कार सुरु झाले असून हा पुरस्कार नाटक, चित्रपट, दूरदर्शन या माध्यमावर पकड असणाऱ्या रंगकर्मींना देण्यात येतो. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

आजपर्यंत दिलीप प्रभावळकर, डॉ. मोहन आगाशे, सदाशिव अमरापूरकर, शरद पोंक्षे, अरुण नलावडे, सुबोध भावे, प्रशांत दामले, डॉ. गिरीश ओक, भरत जाधव, अविनाश व ऐश्वर्या नारकर या रंगकर्मींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 

पुरस्कारानंतर प्रकट मुलाखत

बालवयापासून हिंदी व मराठी सिनेसृष्टी गाजविणारे अभिनेते आणि धुमधडाका, दे दणादण, थरथराट, झपाटलेला असे अनेक मराठी चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक आणि जय मल्हार, विठू माऊली आणि सध्या गाजत असलेली दख्खनचा राजा ज्योतिबा अशा मालिकांचे निर्माते महेश कोठारे यांची कलायात्री पुरस्कारानंतर प्रकट मुलाखत होणार असून कमला कॉलेजचे प्रा. डॉ. सुजय पाटील हे मुलाखतकार आहेत. या मुलाखतीचा आनंद सर्व रसिक प्रेक्षकांनी घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक जयश्री दानवे, राजदर्शन दानवे, सुधीर पेटकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या