Satara Big Breaking : जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला; २०१ पॉझिटिव्ह


कित्येक दिवसांनी प्रथमच जिल्ह्यातील रूग्णवाढीने ओलांडला दोनशेचा टप्पा

Satara Big Breaking : मंगळवारी रात्री उशीरा हाती आलेल्या वृत्तानुसार सातारा जिल्ह्यात तब्बल २०१ जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. गेल्या काही महिन्यातील २४ तासातील रूग्णवाढीचा हा उच्चांक ठरला आहे. जिल्ह्यात कोरोनाला उतरती कळा लागल्यामुळे गेले काही महिने सुखावलेल्या जिल्हावासीयांची या धमाक्याने झोप उडवली आहे.
गेले काही महिने जिल्ह्यातील रूग्णवाढ शंभरच्या आतबाहेर आहे. अलीकडे सरासरी ६० - ७० च्या आसपासही हे आकडे राहिले आहेत. मात्र मागील आठवड्यापासून राज्यात कोरोना संसर्ग वाढत चालल्याच्या बातम्या येऊ लागल्याने प्रशासन, आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. तरी पण सातारा जिल्ह्यात अद्याप सरासरीइतकेच रूग्ण निघत असल्याने जिल्हावासीय काहीसे निश्चिंत होते. पण आज रात्री उशीरा हाती आलेल्या वृत्ताने सर्वांचीच झोप उडवली आहे.
कित्येक दिवसांनंतर प्रथमच जिल्ह्यातील २४ तासातील रूग्णवाढीने दोनशेचा टप्पा ओलांडला आहे. सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील रूग्णालय लॅबमधून १७६, कृष्णा (कराड) २, खाजगी १२, अँटिजेन ११ असे मिळून २०१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ही रूग्णवाढ जिल्हावासीयांसाठी धोक्याची घंटा असून लोकांनी प्रशासनातर्पेâ वारंवार सांगितल्या जात असलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या