Satara News : जिल्ह्यात १३० रूग्ण वाढले; महिला दगावली


शहरांसोबत ग्रामीण भागातही संसर्गात वाढ; अ‍ॅक्टिव्ह रूग्णांचीही संख्या वाढली

Satara News : सातारा जिल्ह्यात गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार १३० नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात कातरखटाव (ता. खटाव) येथील ६७ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये...

सातारा तालुका : सातारा १, शनिवार पेठ १, सदर बझार १, तामजाईनगर १, अमरलक्ष्मी २, शाहूपुरी २, गोडोली २, खेड २, कुसवडे १, सासपडे १, जायगाव १.

कराड तालुका : कराड शहरातील मंगळवार पेठ १, बुधवार पेठ १, कार्वे नाका ३, रेणुकानगर १, मलकापूर २, सैदापूर २, सवादे ४, बेलवडे १, मसूर १, घारेवाडी १.

पाटण तालुका : पाटण १, कोयनानगर १, नाटोशी २, धामणी १, शेंडेवाडी २.

फलटण तालुका : लक्ष्मीनगर १, तरडफ १, शिवाजीनगर १, सांगवी १.

खटाव तालुका : वडूज १, येरळवाडी १, कातरखटाव १, औंध १.

माण तालुका : दहिवडी ८, शिंगणापूर रोड, मार्डी १, जांभुळणी ३, मार्डी ३, बिदाल १, मोगराळे १, गोंदवले बुद्रुक २, पळशी १, हिंगणी १, इंजबाव १, खुटबाव १.  

कोरेगाव तालुका : कोरेगाव २, किरोली २,  खेड १.

खंडाळा तालुका : लोणंद ६, बाळुपाटलाची वाडी १, खंडाळा ८, निंबोडी गावठाण १, निरा १, शिरवळ ३, शिंदेवाडी १.

महाबळेश्वर तालुका : भिलार ३, येरणे २.

जावली तालुका : रायगाव ३, तांबी १, आनेवाडी १, भिवडी १, महू १, कुडाळ ३, रामवाडी २, केळघर १.

वाई तालुका : ओझर्डे १, पसरणी १, बोरगाव १, केंजळ २, गुळुंब १, सुरुर १, वरे १, व्याजवाडी १.

सातारा जिल्हा कोरोना

  • एकूण नमुने - ३४४१३४
  • एकूण बाधित - ५८५०४  
  • घरी सोडण्यात आलेले - ५५४६४  
  • मृत्यू - १८५१ 
  • उपचारार्थ रुग्ण - ११८९ 

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या