Satara News : सातार्‍यात जुगार अड्ड्यावर धाड; मुद्देमाल जप्त


पन्नासहून अनेकजणांची धरपकड; अनेक प्रतिष्ठितांचा समावेश

Satara News : सातारा येथील एका खाजगी हॉस्पिटलसमोरील एका अपार्टंमेंटमध्ये भरणार्‍या जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी ५० हून अधिक जणांना ताब्यात घेतले. यामध्ये शहरातील काही प्रतिष्ठितांचा समावेश असल्याचे उघड झाले आहे. संशयितांकडून रोख रक्कम, वाहने, मोबाईल असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अपार्टंमेंटमध्ये जुगार अड्डा भरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी कारवाईबाबत सूचना केली. पोलिसांचे पथक तयार केले. जुगारबाजांची संख्या अधिक असल्याने पोलिसांनी तगडा फौजफाटा सोबत घेतला. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी एका हॉस्पिटलसमोरील वरदविनायक अपार्टमेंटवर धाड टाकली.

धाड पडल्याचे कळताच पळापळ 

पोलिसांचा फौजफाटा पाहून परिसरातून ये - जा करणारे नागरिक थबकले. तोपर्यंत पोलिसांनी अपार्टंमेंटला वेढा दिला. पोलिसांची रेड पडल्याची कुणकुण लागताच जुगारबाज हडबडले. कोणी उड्या मारुन पळून जाण्याचा, तर कोणी लपून बसण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पोलिसांनी सुमारे १५ मिनिटांमध्ये सर्व जुगारबाजांना गोळा करुन रांगेत उभे केले.

कारवाईत ५१ संशयित असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करण्यास सुरुवात केली. यावेळी जुगाराचे साहित्य, पैसे, मोबाईल, वाहने असा मुद्देमाल होता. पोलिसांनी तो सर्व मुद्देमाल जप्त करुन संशयितांना ताब्यात घेतले. संशयितांना पोलीस व्हॅनमध्ये घालून शाहूपुरी पोलीस ठाण्यात आणले. संशयितांचे पूर्ण नाव, पत्ता घेवून त्यांच्यावर रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांकडे मास्क नसल्याने अनेकांनी तोंडाला बनियन, रुमाल बांधून लपण्याचा प्रयत्न केला.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या