Satara News : गोंदवले ग्रामीण रूग्णालयास मिळणार रूग्णवाहिका


डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या आमदार निधीतून साडेबारा लाखांचा निधी मंजूर

Satara News : कोरोनाच्या काळात ग्रामीण भागात रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोर्‍हे यांनी स्थानिक आमदार निधी कार्यक्रमाअंतर्गत वैजापूर, कन्नड या ग्रामीण रुग्णालयांना निधी उपलब्ध करून दिला आहे. पुण्यात ससून हाँस्पिटलला आणि पुणे महानगरपालिका येथील हॉस्पिटलला एकूण २० लक्ष रुपयांचा निधी ऊपलब्ध करुन दिला आहे.

याचाच भाग म्हणून गोंदवले खुर्द, म्हसवड (जि. सातारा) येथे माणदेशी फाऊंडेशनतर्पेâ ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्याचे उद्घाटन ना. डॉ. गोर्‍हे यांच्या हस्ते झाले होते. यामुळे कोरोनाच्या काळात रुग्णांना खूप मोठा आधार मिळाला होता. याठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याबाबत माणदेशी फाऊंडेशनच्या श्रीमती चेतना सिन्हा यांनी ना. डॉ. गोर्‍हे यांच्याकडे विनंती केली होती.

चेतना सिन्हांकडून कृतज्ञता व्यक्त 

या रुग्णालयासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी ना. डॉ. गोर्‍हे यांनी स्थानिक आमदार निधी २०२०-२१ मधून १२.५० लक्ष रुपये देण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भात सातारच्या जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठविण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांचे उपचारासाठी हाल होणार नाहीत. रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीमती सिन्हा यांनी डॉ. गोर्‍हे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या