Satara News : दहिवडीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने चिंता


जिल्ह्यात ६७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; २ बाधितांचा मृत्यू

Satara News : सातारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ६७ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून २ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

दरम्यान, सातारा तालुक्यासह खटाव, माण तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा जास्त जाणवत आहे. विशेषत: दहिवडीत चोवीस तासात १३ रूग्ण आढळल्याने दहिवडीकरांनी अधिक दक्षता बाळगण्याची आवश्यकता आहे. 

कोरोना बाधित अहवालामध्ये...

सातारा तालुका : सातारा १, शाहूपुरी १, शाहूनगर २, पीरवाडी १, कळंबे १, साईनगर १, चिंचणेर वंदन १, जिहे १.

कराड तालुका : कराड १, विद्यानगर १.

पाटण तालुका : पाटण २.

जावली तालुका : जावली १.

महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर १.

वाई तालुका : वाई ३, रविवार पेठ ४, चिखली १.

कोरेगाव तालुका : कोरेगाव १, रहिमतपूर १, सासुर्वे १, ल्हासुर्णे १, कुमठे १, त्रिपुटी १.

खंडाळा तालुका : शिरवळ २.

फलटण तालुका : फलटण १, जाधववाडी २, कोळकी १.

खटाव तालुका : खटाव ३, वडूज १, वडगाव १, मायणी २, पुसेसावळी १, राजाचे कुर्ले २.

माण तालुका : दहिवडी १३, शेवरी १, ढाकणी १.

जिल्ह्यात कोरोनाने दोघांचा मृत्यू

जिल्हा रुग्णालयामध्ये तरडगाव (ता. फलटण) येथील ७१ वर्षीय पुरुष व खासगी रूग्णालयात वाई येथील ३० वर्षीय पुरुष अशा एकूण २ कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

सातारा जिल्हा कोरोना
  • एकूण नमुने - ३२६९९७
  • एकूण बाधित - ५७३६४  
  • घरी सोडण्यात आलेले - ५४६४८  
  • मृत्यू - १८३७ 
  • उपचारार्थ रुग्ण - ८७९

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या