Satara News : जिल्ह्यात लष्करी छावणी उभारली जावी


लष्करप्रमुखांची भेट घेवून खासदार उदयनराजे यांनी केली 'मन की बात'

Satara News : लष्करी सेवेची महान परंपरा असलेल्या सातारच्या भूमीवर लष्कराचे आधुनिक प्रशिक्षण देणारी लष्कराची छावणी उभारण्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारणे शक्य असल्याचे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे.

खासदार उदयनराजे यांनी नवी दिल्ली येथे लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची भेट घेवून विविध विषयांवर चर्चा केली. त्यानंतर ते बोलत होते. या भेटीत छत्रपती उदयनराजे यांनी लष्करप्रमुख नरवणे यांना छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा खास भेट म्हणून दिली. 

छावणी तरुणांना प्रेरणा देईल

सातारा जिल्हा हा सैनिकांचा असून जिल्ह्यातील अनेक जवानांनी देशासाठी बलिदान दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यात लष्कराचे आधुनिक प्रशिक्षण देणारी छावणी उभारली गेली तर ती जवानांच्या शौर्याच्या शिरपेचात मानाचा तुरा असेल. ही छावणी जिल्ह्यातील तरुणांना प्रेरणा देणारी असेल. लष्कराच्या छावणीला पोषक असे वातावरण आणि सुविधा असल्यामुळे लष्कराकडून याचा नक्की विचार केला जाईल अशी अपेक्षा उदयनराजे यांनी व्यक्त केली.

पायाभुत सुविधा आयत्याच आहेत

लष्करी छावणीसाठी तसेच आधुनिक प्रशिक्षण केंद्र उभारणीसाठी आवश्यक असणार्‍या पायाभूत सुविधा सातारच्या भूमीत आयत्या आहेत. विमानतळ, रेल्वे स्टेशन, राष्ट्रीय महामार्गासह रस्त्याचे जाळे, मुबलक जमीन आणि पाणी यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर सैनिकांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक गड किल्ले हे सुद्धा प्रेरणादायी आहेत. तसेच लष्करी छावणीला आवश्यक असणारी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी आपण कुठेही कमी पडणार नाही असेही उदयनराजे यांनी सांगितले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या