Satara News : लॉकडाऊनच्या काळात दुकान फोडणारा अटकेत


सीसीटीव्हीतील चित्रीकरणाच्या आधारे शाहूपुरी पोलिसांनी केली उकल
 

Satara News : लॉकडाऊनच्या काळात सातारा येथील छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील दुकान फोडून साहित्य लंपास केल्याप्रकरणी एकाला शाहूपुरी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे. धनाजी बबन घाडगे (रा. माजगावकर माळ झोपडपट्टी, सातारा) असे त्याचे नाव आहे. 

लॉकडाऊनच्या काळात झालेल्या या चोरीच्या वेळी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली होती. त्यावेळी सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये संशयित वैâद झाला होता. त्यावरुन संशयित माजगावकर माळ झोपडपट्टी परिसरातील असल्याचे समोर आले होते. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते.

चोरीला गेलेला माल हस्तगत 

दरम्यान, २९ जानेवारीला तो करंजे परिसरात आला असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या कर्मचार्‍यांना मिळाली. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातील त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीला गेलेला पाच हजार रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे. 

पोलीस निरीक्षक संजय पतंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे, हवालदार हसन तडवी, सचिन माने, लैलेश फडतरे, नितीन घोडगे, स्वप्नील कुंभार, आेंकार यादव, मोहन पवार, पंकज मोहिते, सचिन पवार, मनोहर वाघमळे हे या कारवाईत सहभागी होते.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या