Satara News : असहायतेचा फायदा घेऊन परिचारिकेवर अत्याचार


नराधमाकडून वारंवार पती व मुलींचा खून करण्याची धमकी

Satara News : सातारा शहरानजीक उपनगरात राहणार्‍या महिलेला तिचा पती व मुलींचा खून करण्याची धमकी देत, तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने सातारा तालुका पोलीस ठाण्यात अमित शिवाजी बाबर (रा. सातारा) याच्याविरोधात तक्रार दिली आहे. 

पीडित महिला शहरातील एका रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करते. संशयिताचे तिच्या घरी येणे जाणे सुरु होते. एके दिवशी संशयिताने महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. पीडितेने त्या कृत्याबाबत बाबर याला जाब विचारला असता तुझ्या नवर्‍याला व मुलीला मारुन टाकीन अशी धमकी त्याने दिली. त्यानंतर त्याने सतत अशी धमकी देत, त्या महिलेवर वेळोवेळी अत्याचार केले. 

दि. ९ रोजी पीडित महिला ही रुग्णालयात काम करत असताना संशयिताने तिथे जावून पीडितेला उद्देशून तू माझ्यासोबत चल, असे म्हणून गोंधळ घालण्यास सुरुवात करुन तिची बदनामी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी करत आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या