विना मास्क कोणी दिसल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा
सातारा : राज्यासह जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून खबरदारी घेतली पाहिजे. यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता केली पाहिजे, असे आवाहन गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज कोरोना संसर्गाबाबत आयोजित आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.
संपर्कातील २० जणांची कोरोना चाचणी
रस्त्यावर विना मास्क कोणी दिसल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना करुन गृहराज्यमंत्री देसाई पुढे म्हणाले, कोरोनाचा संसर्गाचा रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कातील कमीत कमी २० जणांची कोरोना चाचणी करावी. तसेच जिल्ह्यात कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवावे. भाजी विक्रेते, दुकानदार, रेस्टॉरंटवाले यांची कोरोना चाचणी करण्यावर भर द्यावा. नगर परिषद व मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये मास्क, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता या विषयी जनजागृती करावी.
विवाह समारंभास भेटी द्या
सध्या १०० नागरिकांच्या उपस्थित लग्न समारंभ व इतर धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात येत आहे. परंतु लग्न समारंभात ५०० ते १००० नागरिक उपस्थित राहत असल्याचे निदर्शनास येत आहे. जेथे लग्न समारंभ होत आहे तेथे भेट देवून शासनाने व प्रशासनाने दिल्या सूचनांचे पालन होते काय हे पहावे. पालन होत नसल्यास कारवाई करण्यात यावी. तसेच पोलीस विभागाने पेट्रोलींगचे प्रमाण वाढविले पाहिजे, अशा सूचना देसाई यांनी शेवटी केल्या.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या