दि. ८ ते १० फेब्रुवारीदरम्यान विशेष सभा आयोजित करण्याचे निर्देश
Satara News : ग्रामपंचायत निवडणूक आणि सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत पार पडल्यानंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सरपंच, उपसरपंच निवडीसाठीच्या विशेष सभा दि. ८ ते १० फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्याच्या सूचना सर्व तहसीलदार कार्यालयांना पत्राद्वारे केल्या आहेत. त्यामुळे सरपंच निवडीसाठीच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत.
बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती वगळून उर्वरित ग्रामपंचायतींसाठी डिसेंबर महिन्यात मतदान घेण्यात आले. मतमोजणीनंतर सर्वांना सरपंचपदाच्या आरक्षणाचे वेध लागले होते. यानुसार दोन दिवसांपूर्वी सरपंचपदाची आरक्षण सोडत पार पडली.
सोडतीनंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सरपंच निवडीसाठीची विशेष सभा दि. ८ ते १० या कालावधीत गावपातळीवर आयोजित करण्याचे आदेश सर्व तहसीलदारांना दिले आहेत. सरपंचपद आपल्या गटाकडे खेचून आणण्यासाठी काही गावांमध्ये रस्सीखेच असून त्यासाठी गटातटांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या