सातारासह खंडाळा, कोरेगाव, खटाव, माण तालुक्यांमध्ये प्रादुर्भाव वाढला
Satara News : सातारा जिल्ह्यात सातारा रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ९५ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून पाडेगाव (ता. खंडाळा) येथील ७२ वर्षीय बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
सातारा शहर व तालुक्यासह खंडाळा, कोरेगाव, खटाव, माण तालुक्यांमध्ये कोरोना रूग्णांमध्ये वाढ दिसून येत असून मसूरसारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये कोरोनाने मोठ्या खंडानंतर पुन्हा नव्याने एंट्री केली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा ४, मंगळवार पेठ १, शुक्रवार पेठ १, खोजेवाडी १, लिंब ४.
कराड तालुका : मसूर १, ओगलेवाडी १.
वाई तालुका : बावधन ३.
फलटण तालुका : फलटण २, लक्ष्मीनगर १, सगुनामातानगर २, तांबवे १, निंभोरे १, राजुरी १.
खटाव तालुका : मायणी १, कातरखटाव ४, येरळवाडी २, मांडवे १, सिद्धेश्वर कुरोली १, नांदोशी १, औंध १, नेर १, काटकरवाडी १, फडतरवाडी १, अंबवडे १,
माण तालुका : दहिवडी ७, म्हसवड १, पवारवाडी १, पिसाळवाडी २, तुपेवाडी २, भोवडी १, बोडके १, वावरहिरे १, नरवणे १.
कोरेगाव तालुका : कोरेगाव ५, वाठार स्टेशन ३, न्हावी बुदु्रक १, नांदवळ १, आसनगाव ३, रणशिंगवाडी १.
खंडाळा तालुका : लोणंद ५, शिरवळ ३, पळशी १, खंडाळा ४, विंग २,
महाबळेश्वर तालुका : पाचगणी २, ताईघाट १.
जावली तालुका : गणेशवाडी १, करंडी १, महिगाव १.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - ३३८५८५
- एकूण बाधित - ५८०३१
- घरी सोडण्यात आलेले - ५५०९७
- मृत्यू - १८४८
- उपचारार्थ रुग्ण - १०८६
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या