मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसात गुन्हा दाखल
Satara News : पुणे ते बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर शेंद्रे गावच्या हद्दीत बेदरकारपणे रिक्षा चालवून मागे बसलेल्या प्रवाशाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी रिक्षाचालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विनोद धोंडिराम धेंडे (सध्या रा. गोवंडी, मुंबई, मूळ रा. बेनापूर, ता. खानापूर, जि. सांगली) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे.
दि. ११ फेब्रुवारी रोजी तो रिक्षा घेऊन कोल्हापूरच्या दिशेने निघाला होता. त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना तसेच विमाही नव्हता. शेंद्रे हद्दीत त्याने रिक्षाला अचानक झोला मारला. त्या झोल्यामुळे मागील सीटवर बसलेले मोहन शिवा कांबळे (वय ५०) हे रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले.
मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू
प्राथमिक उपचारानंतर त्यांना मुंबई येथे उपचारासाठी नेण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. चौकशीमध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यानंतर हवालदार समीर बाळकृष्ण महांगडे यांच्या फिर्यादीनुसार धेंडे याच्यावर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक फरांदे तपास करत आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या