Satara News : भीषण अपघातात मसूरच्या दोन युवकांचा मृत्यू


रस्त्याकडेला थांबलेल्या मालट्रकला झायलो कारने दिली पाठीमागून धडक 

Satara News : गुरूवारची रात्र मसूरमधील दोन युवकांसाठी काळरात्र ठरली. रस्त्याकडेला थांबलेल्या मालट्रकला झायलो कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात हे दोन युवक जागीच ठार झाले, तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील सुरूर गावाजवळ उड्डाण पुलावर काल मध्यरात्रीनंतर ही दुर्घटना घडली. मसूरमध्ये आज सकाळी हे वृत्त पसरले आणि सर्वत्र सन्नाटा निर्माण झाला. दुपारी शोकाकूल वातावरणात दोघांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

काल रात्री उशीरा बंगळुरूच्या दिशेने निघालेला मालट्रक (एमएच १२ पीक्यू ६८४८) पुढचा टायर फुटल्याने सुरूर येथील उड्डाण पुलावर बाजुला उभा होता. रात्री पाऊणच्या सुमारास पुण्याहून मसूरकडे निघालेली झायलो कार (एमएच ०४ जीडी १२०५) या मालट्रकला पाठीमागून जोरात धडकली. ही धडक इतकी भीषण होती, की कारच्या पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला.

जखमींवर सातार्‍यात उपचार 

या अपघातात कार चालवत असलेला अजय राजेंद्र सुतार (वय २६), केदार दत्तात्रय वेल्हाळ (वय २५, दोघेही रा. मसूर) हे दोघेजण जागीच ठार झाले, तर कारमधील सुजीत रामचंद्र आवटे (वय ४२, रा. रूक्मिणीनगर, कराड), अशोक शिवाजी कांबळे (वय ३५, रा. कणसे मळा, वाघेरी, ता. कराड) हे दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ सातारा येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातामुळे पुणे ते कोल्हापूर लेनवरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच जोशी विहीर महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक एस. के. पोवार व त्यांचे कर्मचारी तसेच भुईंज पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना सातारला हलवले व मृतदेह कवठे आरोग्य केंद्राकडे पाठवण्याची व्यवस्था केली. त्याचप्रमाणे महामार्गावरील वाहतुक सुरळीत केली. भुईंज पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.


गावच्या वाटेवर काळाचा घाला

केदार व अजय हे मित्र होते. केदार शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात होता. त्याला रिमिक्स गाण्यांचा छंद होता. त्याने गायिलेली काही गाणी दुबई रेडिओवरून प्रसारित झाली आहेत. तसेच अजयला फोटोग्राफीचा छंद होता. काल रात्री केदार मुंबईवरून पुण्याला अजयकडे आला व तिथून ते मसूरकडे चालले असताना वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या अपघाती मृत्युची बातमी आज सकाळी गावात पसरली आणि गावावर शोककळा पसरली. दुपारी त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या