सैनिक स्कूलसाठी अर्थसंकल्पात करणार वेगळ्या निधीची तरतूद - अजित पवार
Satara News : सातारा जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना २०२१-२०२२ मूळ २६४ कोटी रुपयाच्या प्रारूप आराखड्यात ११०.५० कोटी वाढ करून ३७५ कोटी रुपयाच्या निधीच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती वित्त व नियोजन तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून सातारा शहरात सुरू झालेल्या सैनिक स्कूलचा राज्यासह देशात नावलौकीक वाढावा यासाठी येथील इमारती व इतर कामांसाठी वेगळ्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येईल, अशी ग्वाहीही पवार यांनी दिली.
जिल्हा वार्षिक योजना २०२१-२२ (सर्वसाधारण) राज्यस्तरीय बैठक पुणे येथे विभागीय आयुक्त कार्यालयात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस सहकार व पणन तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, अतिरिक्त मुख्य सचिव देबाषीश चक्रवर्ती, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
वृक्ष जगवण्यासाठी मनरेगाचा निधी वापरा
सातारा जिल्ह्यात वन विभागाने फॅगोडाचे काम अतिशय उत्तम करावे, असे सांगून उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, आत्तापर्यंत वन विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध ठिकाणी वेळोवेळी वृक्षारोपन करण्यात आले आहे. हे वृक्ष जगविण्यासाठी मनरेगाचा निधी वापरावा. स्मशानभूमीतील पत्र्यांचे शेड हे वारा, पाऊस व ज्वालामुळे खराब होऊ शकतात. त्यामुळे स्मानशभूमीतील शेड कायमस्वरुपी रहावे यासाठी सिमेंट क्राँक्रीटचे स्लॅब टाकावे, अशाही त्यांनी बैठकीत सूचना केल्या.
सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाबतीत प्रत्येक १५ दिवसांनी वरिष्ठ स्तरावर बैठक घेण्यात येत आहे. या महाविद्यालयाच्या कृष्णानगर येथील जागेवर अतिक्रमण होणार नाही तसेच तेथील झाडे तोडली जाणार नाहीत यावर लक्ष द्या, असे कोणी केलेले आढळले तर त्यावर कडक कारवाई करावी. याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांनी लक्ष द्यावे तसेच पालकमंत्री यांनी वेळोवेळी भेटी देऊन आढावा घ्यावा अशी सूचनाही केली.
विश्रामगृहांच्या सुविधांमध्ये वाढ
पर्यटनाचा चालना देण्यासाठी महाबळेश्वरचा विकास, राज्यासह देशात सातारा सैनिक स्कूलचा नावलौकीक वाढावा यासाठी इमारत, इतर सुविधा व सुशोभिकरणासाठी तसेच शासकीय विश्रामगृहात देण्यात येणार्या सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात येणार असल्याचेही अजित पवार यांनी बैठकीत सांगितले. यावेळी आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे यांनी विकासाबाबत मुद्दे उपस्थित केले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या