डॉ. सुलभा विधाते यांनी वेबिनारमधून दिल्या सोप्या अभ्यासाच्या टीप्स
Satara News : दहावी बोर्डाची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांचा वाढता ताण आणि पालकांची वाढलेली काळजी; त्यातच कोरोनामुळे शिकविण्यात आलेला ऑनलाईन अभ्यास. त्यामुळेच यंदा बोर्डाची परीक्षा जास्त धास्ती घेऊन आली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र वाईतील दिशा अॅकॅडमीने पुढाकार घेत विद्यार्थ्यांचा अभ्यास सोपा व्हावा, त्यांच्या शंकांचे समाधान व्हावे यासाठी तज्ञांचे मोफत वेबिनार आयोजित केले आहेत. त्यापैकी सायन्स विषयाचा मोफत वेबिनार डॉ. सुलभा विधाते यांनी नुकताच घेतला.
दिशा अॅकॅडमीने डॉ. विधाते यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाचा लाभ आपल्या यु-ट्यूब चॅनेलद्वारे उपलब्ध करून दिला. या लाईव्ह मार्गदर्शन सत्रात सातशेपेक्षा अधिकजण सहभागी झाले होते, तर झुमच्या माध्यमातून सुमारे पाचशे जणांनी मोफत वेबिनारचा लाभ घेतला. यामुळे प्रत्यक्ष बोर्ड परीक्षेसाठी पेपरचा अभ्यास कसा करायचा, परीक्षकांच्या विद्यार्थ्यांकडून असलेल्या अपेक्षा, आदर्श उत्तरे कशी असावीत अशा विविध मुद्यांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले. डॉ. विधाते या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या सदस्या असून सायन्स विषयाचा अभ्यासक्रम तयार करणार्या कमिटीच्या सदस्या आहेत तसेच बालभारतीच्या सायन्स समितीच्या त्या सदस्या आहेत.
वेबिनारचा लाभ घेण्याचे आवाहन
सायन्स विषयाची भीती घालवून साध्या सोप्या पद्धतीने सायन्सशी कशी मैत्री करता येईल यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू असे सांगत दिशा अॅकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन कदम यांनी इतर विषयांच्या मोफत वेबिनारचा लाभ विद्यार्थ्यांनी जरूर करून घ्यावा असे सांगितले आहे. २१ मार्चपर्यंत येणार्या प्रत्येक रविवारी सायंकाळी ७ ते ८ या वेळात होणार्या मोफत वेबिनारच्या अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी ७७७ ५९२ ५९२३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या