बेकायदा उत्खननाबद्दल तक्रार केल्याने हल्ला झाल्याचा जखमीचा जबाब
Satara News : सातारा येथील राजवाडा परिसरात झालेल्या कोयता हल्ल्यात एक जण जखमी झाला. या घटनेमुळे राजवाडा परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
सुधीर किसन देसाई (वय ४७, रा. पुनवडी, ता. सातारा) असे जखमीचे नाव आहे. ते राजवाडा परिसरात कामासाठी आले होते. दोन अनोळखी युवकांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केला. याबाबतची माहिती मिळाल्यावर नातेवाइकांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या पायावर कोयत्याने वार झाले आहेत. त्यातील एक जखम गंभीर आहे.
शेतामध्ये गौण खनिजाचे बेकायदा उत्खनन केले जात होते. याबाबत मी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रार केली होती. या तक्रारींच्या कारणातूनच कोयत्याने हल्ला झाला असल्याची शक्यता सुधीर देसाई यांनी व्यक्त केली आहे. उपचारानंतर जिल्हा रुग्णालयातील पोलीस कक्षातील पोलिसांकडून त्यांचा जबाब नोंदविण्यात आला.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या