Satara News : वनक्षेत्रपाल कुलकर्णींकडून २९ लाख वसुलीला विलंब


ढेबेवाडी वनपरिक्षेत्रात निकृष्ट दर्जाची कामे राबवल्याबद्दल ठरवले होते दोषी
 

Satara News : ढेबेवाडी वनपरिक्षेत्रात निकृष्ट दर्जाची कामे राबवल्याबद्दल वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी यांना दोषी ठरवून त्यांच्याकडून २९ लाख रुपये वसूल करावेत असा अहवाल सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकार्‍यांनी मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला असून या वसुलीकडे जाणीवपूर्वक विलंब व टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार रोहन भाटे व नाना खामकर यांनी मुख्य सचिवांकडे केली आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या ढेबेवाडी वनपरिक्षेत्रात निकृष्ट दर्जाची कामे २०१८ साली करण्यात आली होती. त्यात वनतळी, ग्याबियान बंधारे, अनगड दगडी बांध इत्यादींची कामे होती. ही कामे निकृष्ट दर्जाची व हलके साहित्य वापरून करण्यात आल्याची तक्रार व पुरावे भाटे व खामकर यांनी दिले. या तक्रारीवरून चौकशी करण्यात येऊन वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी यांना दोषी ठरवण्यात आले व शासनाचे नुकसान केल्याबद्दल त्यांच्याकडून २९ लाख रुपये वसूल करावेत असा अहवाल सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांनी महाराष्ट्र शासनाकडे पाठवला. परंतु ही वसुली होण्यासाठी विलंब होत असल्याची तक्रार रोहन भाटे व नाना खामकर यांनी राज्याचे मुख्य सचिव तसेच प्रधान सचिव (वने) यांच्याकडे केली आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या