Satara News : वाईत शाळेची इमारत पाडल्याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा


तोडफोडीची गंभीर दखल; कायदेशीर लढा देणार - अभयकुमार साळुंखे
 

Satara News : वाई येथील रविवार पेठेतील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या गर्ल्स हायस्कूलची इमारत पाडल्याप्रकरणी ब्राह्मो समाजाचे अध्यक्ष मीनल राजेंद्र साबळे व राजेंद्र सर्जेराव साबळे या दोघांवर वाई पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका रेखा ठोंबरे यांनी याबबात फिर्याद दिली आहे.

वाईतील रविवार पेठ येथे असलेल्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या गर्ल्स हायस्कूलच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून मीनल साबळे (वय ४५), राजेंद्र साबळे (वय ५२, दोघे रा. सातारा) यांनी संगनमताने शाळेतील १० संगणक, प्रिंटर महत्वाची कागदपत्रे, शाळेचे रेकॉर्ड, फर्निचर अशा सुमारे १ लाख १० हजार रुपयांच्या ऐवजाचे नुकसान केले. तसेच शिवीगाळ व दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

संस्थेने घेतली गंभीर दखल

दरम्यान, वाई येथील गर्ल्स हायस्कूल या मुलींच्या शाळा इमारतीची झालेली तोडफोड संस्थेने गंभीरपणे घेतली असून मुलींच्या शिक्षणासाठी संस्था कायदेशीर लढा देणार असल्याचे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांनी गर्ल्स हायस्कूल इमारतीची पाहणी केल्यानंतर सांगितले. यावेळी संस्थेचे सहसचिव डॉ. राजेंद्र शेजवळ, मुख्याध्यापिका रेखा ठोंबरे, डॉ. नितीन कदम, गिरीष गायकवाड, राजकुमार बिरामणे, अशोकराव सरकाळे, उषा ढवण आदी उपस्थित होते.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या