घातपाताचा प्रकार असण्याचा पोलिसांचा कयास; ‘लंबे हात’ काढणार माग
Satara News : वाई तालुक्यातील कवठे शिवारातील ज्वारीच्या पिकांमध्ये अंदाजे ४५ वयाच्या इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. हा घातपाताचा प्रकार असावा असा पोलिसांचा कयास असून पोलिसांनी कसून शोधमोहीम सुरु केली आहे.
कवठे येथील किसन वीर स्मारकाशेजारील भानुदास पोळ यांच्या शेतात ऊस तोडणीसाठी असलेल्या कामगाराला शेजारील ज्वारीच्या पिकामध्ये हा मृतदेह आढळून आला. त्याने ही बाब अविनाश देवकर व शेतमालक संदीप पोळ यांना सांगितली. संदीप पोळ यांनी भुईंज पोलीस स्टेशनला फोन करुन या घटनेची माहिती दिली.
मृताच्या शरीरावर मारहाणीचे व्रण
अंदाजे ४५ वय असलेला या मृत व्यक्तीच्या अंगात लाल बनियान व काळ्या रंगाची पँट आहे. मृताच्या शरीरावर मारहाणीचे व्रण दिसत असून डोक्याच्या पाठीमागेसुध्दा मारहाण झाल्याचे जाणवत आहे. त्याच्या उजव्या कानात बाळी घातलेली आहे. अंदाजे २ ते ३ दिवसांपूर्वी ही व्यक्ती मृत झाली असण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी मृतदेह पडला होता त्याच्या आसपासच्या ज्वारी पिकाची झटापटीत नासाडी झाल्याचे दिसून येत आहे.
पोशाखावरुन ही व्यक्ती ऊसतोड टोळीतील कामगार किंवा एखाद्या ट्रकवरील क्लिनर असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबतची माहिती भुईंज पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांना कळताच त्यांनी तातडीने उपनिरीक्षक निवास मोरे, फौजदार अवघडे, डी. एन. गायकवाड, सी. एम. मुंगसे व कॉन्स्टेबल मंदार शिंदे यांना घटनास्थळावर पाठवले. शवविच्छेदन कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या