Satara News : अखेर ‘रॉयल वेज’च्या कोळपेच्या आवळल्या मुसक्या


पाच महिन्यांत रक्कम दामदुप्पट करुन देतो असे सांगत कोट्यवधीची फसवणूक

Satara News : पाच महिन्यांत रक्कम दामदुप्पट करुन देतो म्हणून सातारा, पुणे, सोलापूर, सांगली, नगर, बागलकोट (कर्नाटक) आदी जिल्ह्यांतील हजारो लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या रॉयल वेज मार्वेâटिंग बिजनेस प्रा. लिमिटेड कंपनीचा अध्यक्ष विठ्ठल अंकुश कोळपे (रा. कुसूर, ता. फलटण) यास लोणंद पोलिसांनी सुखेड (ता. खंडाळा) येथे सापळा रचून अटक केली.

विठ्ठल कोळपे व त्यांचे अन्य साथीदार यांनी कंपनीच्या माध्यमातून पाच महिन्यांत रक्कम दामदुप्पट करुन देतो म्हणून २८ ते ३० एजंटांमार्फत सातारा जिल्ह्यातील लोणंद, वाठार स्टेशन, कोरेगाव, सातारा, म्हसवड तर सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते, अकलूज, सांगली जिल्ह्यातील इश्वरपूर तसेच पुणे, नगर, बागलकोट (कर्नाटक) आदी जिल्ह्यांतील महिलांचे बचत गट व प्रत्यक्ष खातेदारांशी व्यक्तिगत संबंध प्रस्थापित करुन ५० हजार रुपयांपासून १२ लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा केली. कोट्यवधी रुपयांची माया जमवून फसवणूक करत गंडा घालण्याचे काम सुरुच होते. याबाबत त्यांच्याविरुद्ध ठिकठिकाणी फसवणुकीचे गुन्हेही दाखल झाले आहेत. मात्र या कंपनीचा म्होरक्या विठ्ठल कोळपे हा पोलिसांच्या हाती लागत नव्हता.

सुखेडमध्ये सापळा रचून जेरबंद

दरम्यान, विठ्ठल हा सुखेडला बहिणीकडे येणार असल्याची माहिती लोणंदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांना माहितगार सूत्रांकडून समजली. चौधरी व त्यांचे सहकारी हवालदार महेश सपकाळ, श्रीनाथ कदम, विठ्ठल काळे व दत्ता दिघे आदींनी सुखेड येथे सापळा रचून विठ्ठलला शिताफीने अटक केली. विठ्ठलला अटक झाल्याचे समजताच फसवणूक झालेल्यांपैकी अनेक खातेदारांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. दरम्यान, या प्रकरणातील कंपनीचे अन्य संचालक तसेच एजंटांसह अनेक मोहरे पोलिसांची हाती लागण्याची शक्यता असून, पोलिसांनी त्या दिशेने वेगाने तपासाची सूत्रे हलवण्यास सुरुवात केली आहे. पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी करत आहेत. 

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या