Satara News : शिवसेनेचे सातार्‍यात ‘गाडी ओढो’ आंदोलन


इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Satara News : सातारा जिल्हा शिवसेनेने आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाडी ओढून इंधन दरवाढीचा जोरदार निषेध केला. या अभिनव आंदोलनावेळी शिवसैनिकांनी ‘या मोदी सरकारचं करायचं काय ? खाली मुडी वर पाय’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले, सातारा तालुकाप्रमुख दत्ताजी नलावडे, रमेश बोराटे, शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, नितीन लकेरी यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दरवाढीमुळे वाहने विकण्याची वेळ

पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या किमती केंद्र सरकाच्या निष्क्रीयपणामुळे वारंवार वाढत आहेत. यासंदर्भात निषेधासाठी सातारा जिल्हा शिवसेनेने अशा प्रकारचे अभिनव आंदोलन केले आहे. पेट्रोल - डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना वाहने विकायची वेळ आली आहे. अशा वेळी लोकांनी या गाड्या विकायच्या की ओढत चालवायच्या याकडे लक्ष वेधण्यासाठी अभिनव आंदोलन आहे, असे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यावेळी म्हणाले. 

केंद्र सरकारने पेट्रोल - डिझेलवर अनेक प्रकारचे कर लावले आहेत. त्यामुळे या किमती वाढत आहेत. सत्तेवर येताना मोदींनी अनेक जुमले दाखवले होते, त्यापैकी पेट्रोल - डिझेल व घरगुनी गॅसचे दर आम्ही कमी करणार हा एक जुमला होता. परंतु ते निवडणुकीपुरतेच होते. प्रत्यक्षात मात्र कष्टकरी लोकांची बिकट परिस्थिती झाली आहे, असेही ते म्हणाले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या