Satara News : सोळशीजवळ वाटमारी; अडिच लाखांचा ऐवज लंपास


पुण्याहून देवदर्शनासाठी आलेल्या दांपत्याला तीन अज्ञातांनी धाक दाखवून लुबाडले

Satara News : कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथील केदारेश्वर मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यावर धनकवडी (पुणे) येथील फिरायला आलेल्या दांपत्याला तीन अज्ञात चोरट्यांनी दगडाचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोकड लुटल्याची घटना घडली.

योगिराज विजय माने (रा. धनकवडी, पुणे) देवदर्शनासाठी सोळशी येथील शनी मंदिरात आले होते. दर्शन घेऊन ते दोघे केदारेश्वर मंदिराकडे जात होते. पण केदारेश्वर मंदिराचे अंतर जास्त असल्यामुळे अर्ध्या रस्त्यातूनच ते माघारी फिरले. त्यावेळी तीन अनोळखी व्यक्ती आल्या. तीनपैकी एक दुचाकीवर उभा होता. बाकीच्या दोघांनी हातात दगड घेऊन फिर्यादी महिलेस व तिच्या पतीस दमदाटी करुन अंगावरील सोन्याची मागणी केली.

लुटमार करून चोरटे पसार

ज्या ठिकाणी घटना घडली, ते निर्जन ठिकाण असल्यामुळे भीतीपोटी फिर्यादीने अंगावरील सोन्याचे दागिने व पाच हजार रुपयांची रोकड दिली. सोन्याचे दागिने, मोबाईल व रोकड असे मिळून २ लाख ५१ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी घेऊन तिथून पोबारा केला. याबाबतची फिर्याद पल्लवी माने (रा. धनकवडी, पुणे) यांनी वाठार पोलीस ठाण्यात दिली असून पुढील तपास वाठार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे करीत आहेत. 

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या