Satara News : जानकर म्हणतात, १५ आमदार निवडून आणणार


उद्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणे आम्हीही किंगमेकर होऊ

सातारा : राष्ट्रीय समाज पक्षाला केवळ राज्यातच नव्हे, तर राज्याबाहेरही प्रतिष्ठा आहे. पक्षाची ताकद वाढत आहे. त्याचे प्रतिबिंब आगामी काळात दिसून येईल. विधानसभेत रासपचे १५ आमदार निवडून आणणार असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणे रासप राज्यातील किंगमेकर पक्ष ठरेल, असे रासपचे अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांनी म्हटले आहे.
सातारा येथील नगरपालिका मंगल कार्यालयात रासपचा मेळावा आयोजित केला होता. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सातारा जिल्ह्यात फलटण आणि माण विधानसभा मतदारसंघावर रासपने लक्ष केंद्रित केले आहे. या दोन्ही
तालुक्यांमध्ये रासपची ताकद मोठी आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये रासपचे आमदार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

वादग्रस्त कृषी विधेयकांचे समर्थन

केंद्रीय कृषी मंत्री पदावर असलेले नरेंद्रसिंह तोमर हे शेतकर्‍यांचे
पुत्र आहेत. शेतकर्‍यांची परिस्थिती त्यांना चांगली माहीत आहे.
काँग्रेसचे कृषी कायदे चुकीचे असल्यानेच देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्या रोखण्यासाठी तसेच शेतकर्‍यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी मोदी सरकारने कृषी विधेयके मंजूर केली आहेत. त्या विधेयकामुळे निश्चितपणाने शेतकर्‍यांचा लाभ होणार आहे, असे सांगत जानकर यांनी वादग्रस्त कृषी विधेयकांचे समर्थन केले.

महायुती सरकारच्या काळामध्ये पशुसंवर्धन मंत्री असताना मी गायीच्या व म्हशीच्या दुधाला दर वाढवून दिला. आता भाजप व मित्र पक्षांचे सरकार सत्तेवर नाही. महाविकास आघाडीच्या सरकारची नियत चांगली नाही. आम्ही सत्तेवर असतो तर गाईच्या दुधाला ६५ रुपये आणि म्हशीच्या दुधाला ८५ रुपये
दर दिला असता, असे ते म्हणाले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या